केजीएफ’ चित्रपटाचा सुपरस्टार यश हा केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाने कमाईचे सर्वचं रेकॉर्ड तोडले आहेत. याचं सिनेमामुळे यश खुप प्रसिद्ध झाला. यानिमित्त जाणून घेऊयात यश नेमका एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो व त्याची एकूण संपत्ती किती आहे ती जाणून घेऊयात.
‘केजीएफ’ चित्रपटाचा सुपरस्टार यश हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो आपल्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेतो. तो जवळपास 10 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे, पण त्याला खरी ओळख ‘केजीएफ’ या चित्रपटातून मिळाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशची एकूण संपत्ती 53 कोटी रुपये आहे. 2021 मध्ये KGF 1 च्या यशानंतर, यश त्याची पत्नी राधिका पंडित आणि दोन मुलांसह बंगलोरमध्ये 5 कोटी रुपयांच्या नवीन डुप्लेक्स फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. ‘KGF 2’ या चित्रपटासाठी त्याने 8 ते 10 कोटी रुपये फी घेतली आहे.
एका आलिशान घराशिवाय यशकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. या अभिनेत्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज आणि ऑडी लक्झरी ब्रँडची वाहने आहेत ज्यांची किंमत करोडो आहे. यश कन्नड आणि तेलुगु चित्रपटांतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. याशिवाय तो ब्रँड प्रमोशनमधूनही भरपूर पैसे कमावतो. यश अनेक मोठ्या ब्रँड्सचे अॕम्बेसेडर बनले आहेत. यश ‘खलनायक’ नावाच्या परफ्यूमची जाहिरात करतो ज्यासाठी त्याने मोठी रक्कम गोळा केली होती.