पाश्चात्य मालकीच्या लोकप्रियतेला टक्कर देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावातील एका तरुणाने कंबर कसलीये. त्याने तोडीसतोड असे स्वदेशी धाटणीचे “इंडियाबुक” (Indiabook) तयार केलं आहे. हे अँप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून अवघ्या 30 दिवसात 18 हजाराहून अधिक युजर्संनी डाउनलोड केलं आहे.
काम सोपं व्हावं म्हणून सर्वत्र मोबाईलचा वापर करताना दिसून येत आहे. मात्र यात वापरण्यात येणारे सर्व अँप स्वदेशी नाहीत. असा प्रश्न अमळनेर येथील लक्ष्मीकांत सोनार या 26 वर्षीय तरुणाला पडला. यानंतर त्याने फेसबुकला टक्कर देणारे अँप तयार करण्याचा विचार केला. फेसबुक सारखे इंडियाबुक (Indiabook) अँप या तरुणाने तयार केले आहे. या अँप मध्ये फेसबुक सारखे सर्व फीचर्स आहेत.
फेसबुकची मित्र संख्या ही फक्त ५ हजार असतांना त्याहून अधिक अशी १० हजार अशी मित्र संख्या इंडियाबुक मध्ये कार्यान्वित केली आहे.
विविध लाइव्ह कॉल, ऑडिओ कॉल, शेयरिंग कंनेक्टीव्हिटी फीचर उपलब्ध.
फ्रॉड व हॅकिंगचे प्रकार घडणार नाही, याची देखील विशेष काळजी.
निगेटिव्ह असणाऱ्या पोस्ट रिपोर्ट करताच होणार डिलीट.
यूजर्स व्हेरिफाइड बॅच नसणाऱ्यांना देखील तत्काळ आपण ब्ल्युटिक व्हेरिफाइड मिळवू शकतात.
अॕपची साईझ सुद्धा अगदी कमी त्यामुळे मोबाइलवर भार कमी असणार आहे.
मराठमोळ्या तरुणांच्या या इंडियाबुकला भविष्याच्या दृष्टीने चांगले सकारात्मक माध्यम बनवायचे आहे. यासाठी भविष्यातील अपडेट्समध्ये ‘कम्युनिटी’ वैशिष्ट्य आणण्याच्या दिशेनेही काम करत आहे. कम्युनिटी ही एक खाजगी जागा आहे, जिथे विशिष्ट ग्रुप एडमिन्स वर अधिक नियंत्रण असते. विशेष सर्व्हरची सुद्धा सोय केली आहे. यासाठी एका खास फीचरवर काम करत आहे.
इंडिया बुकमध्ये यात बिझनेस पेजेस, इन्स्टंट ब्ल्युटिक, जाहिरात, गेम्स, व्हिडिओ, जॉब, जुने नवीन विक्री यासह मायक्रो ब्लॉगिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म फेसबुकपेक्षा आहे दुप्पट क्षमतेचा उपलब्ध करण्यात आला आहे.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यातून या युवा अॕप प्रचंड लोकप्रिय झाले आहे. आतापर्यंत 18 हजार यूजर्सनी या अॕपला डाउनलोड केले आहे. तर दररोज १० हजार यूजर्स अॕक्टिव्ह असतात.