राज्यातून मुंबईत सर्वाधिक रुग्णांचं निदान झालंय. बीए .5 या नव्या व्हेरिएंटचे रुग्णही आढळले आहेत. तर सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेला आहे.
त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आरोग्य विभागाने वर्तवले आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वतःचे पूर्ण काळजी घ्यायचे आवाहन त्यांनी केलेले आहे.
राज्यात यंदाच्या वर्षातली विक्रमी कोरोना रूग्णवाढ झाली आहे. दिवसभरात 4 हजार 255 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. तसेच नव्या व्हेरियंट BA.5 ची दोघांना लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेलाय. राज्यात सध्या 20,634 जणांवर रुग्णांवर कोरोना उपचार सुरु आहेत.
जूनधील दैनंदिन कोरोन रुग्णसंख्या
गुरुवार 16 जून : 4 हजार 255
बुधवार 15 जून : 4 हजार 24
मंगळवार 14 जून : 2 हजार 956
सोमवार 13 जून : 1 हजार 885
रविवार 12 जून : 2 हजार 946
शनिवार 11 जून : 2 हजार 922
शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81