सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 15 फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलीय. आतापर्यंत पुणे, (Pune) अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील 6 लाख 10 हजार 120 विद्यार्थ्यांनी भरले परीक्षांचे अर्ज दाखल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या. अखेर ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ प्रशासन आता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार याकडे देखील लक्ष लागलंय. विद्यार्थ्यांनी 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादरक केल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भातील पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा होणार ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. या परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत पुणे,अहमदनगर ,नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील 6 लाख 10 हजार 120 विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज भरले आहेत, अजूनही 2 लाख 9 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणं बाकी असल्याची माहिती आहे.
20 जानेवारीपर्यंतच भरता येणार परीक्षांचे अर्ज,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. 2019 च्या पँटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे.
दोन दिवसापूर्वीपर्यंत ऑनलाईन परीक्षेचं काम कोणत्या एजन्सीला द्यायचं यावर विद्यापीठाचा निर्णय झालेलं नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी एजन्सी नि्वडली नसल्यानं परीक्षा लांबणीवर पडण्याबाबत चर्चा होत्या. मात्र, विद्यापीठानं परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गेल्यावर्षी विद्यापीठाच्याच एजन्सीनं परीक्षांच काम पाहिलं होतं कदाचित त्याच एजन्सीकडे काम जाण्याची शक्यता आहे.