पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना करू नाही दिलं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनाच याचे आश्चर्य वाटले.

देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा आज पार पडला.यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे

कार्यक्रम सुरू असताना भाषणासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यानंतर खुद्द मोदी यांनीही अजित पवार यांच्याकडे हात दाखवून भाषणासाठी विचारणा केली. मात्र आपण भाषण करा असा अजित पवार यांनी सुचवले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे

ही खूप दुर्दैवी आहे. हा महाराष्ट्राचा आणि पुण्याचा अपमान आहे.  अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहे. पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती पाठवली होती. पण ती केंद्र सरकारने नाकारली होती. देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की नाही हा पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आहे. जर विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जात असेल तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांना संधी देत नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हे खूप दुर्दैवी आहे. इतक्या कोत्या मनाचे असतील हे पहिल्यांदाच राजकारणात होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

आम्हाला संत परंपरेचा, वारकऱ्यांचा सार्थ अभिमान आहे. मी स्वत: वारी चालत असते. वारीमध्ये कुणीही मोठं नसतं आणि कुणीही लहान नसतं. माऊली म्हणून पांडुरंगाची आठवण करून लाखो वारकरी वारीत येत असतात. पंतप्रधान जेव्हा म्हणता प्रेमाचा संदेश घेऊन आलोय. त्यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीपूर्वक बोलू दिलं जात नाही, हे खूप दुर्दैवी आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.