रिषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडियाने अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव 19.1 ओव्हरमध्येच 131 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेतील आव्हान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे.
आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 29 धावांची खेळी केली. रिझा हेन्ड्रिक्सने सर्वाधिक 23 धावा केल्या. अनुभवी वेन पार्नेलने नॉट आऊट 22 रन्सचं योगदान दिलं. प्रिटोरियसने 20 धावा जोडल्या.
तर केशव महाराजने 11 रन्स केल्या. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या बॉलर्सनी आफ्रिकेच्या एकाही बॅट्समनला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
टीम इंडियाकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल युझी आणि हर्षलला चांगली साथ दिली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :
ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.
दक्षिण अफ्रिका प्लेइंग XI
टेम्बा बावुमा (कप्तान), रीजा हेंड्रिक्स, रस्सी वॅन डेर डूसन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिच नॉर्तजे आणि तबरेज शम्सी.