सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असातात. आज कालच्या पिढीला सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ टाकण्याची सवय झाली आहे. या फोटो आणि व्हिडीओच्या नादात अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला आहे. अशीच एक घटना पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये घडली आहे. रेल्वे रुळावर तीन मित्र सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी व्हिडीओ काढताना असताना हा अपघात घडला. व्हिडीओ काढताना या तीन मित्रांपैकी एकाला रेल्वेनं धडक दिली. त्यात त्यानं जीव गमावला. मृत मुलगा १४ वर्षांचा होता. या तिन मित्रांच्या हा शेवटचा व्हिडीओ दुदैवाने अपघात कॅमेऱ्यात कैद झाला.
हुगळीतील भग्रेश्वर रेल्वे स्थानकाजवळ दुर्गा पूजा सुरू होती. सर्वकडे उत्साहचं वातावरण होते. त्यावेळी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तीन मित्र व्हिडीओ चित्रित करत होते. धीरज पाटील (१४), दीपू मंडल (१८) आणि आकाश पांडे (१९) व्हिडीओ चित्रित करण्यात अतिशय व्यस्त होते. रेल्वेनं त्यांना हॉर्न दिला. मात्र तो त्यांना ऐकू आला नाही.
भद्रेश्वर रेल्वे स्थानकाजवळून लोकल ट्रेन जात होती. ट्रेनच्या धडकेत किशोर पाटीलचा मृत्यू झाला. या अपघातातून दीपू मंडल आणि आकाश पांडे थोडक्यात वाचले. अपघाताची माहिती मिळताच जीआरपी गोपाल गांगुलींच्या नेतृत्त्वाखालील टीमनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी किशोरचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.