नवीन वर्षात नव्या संकल्पाची प्रत्येकाने आखणी केली आहे. अन्य संकल्पांसोबत वर्ष 2022 मध्ये तुमचा अर्थ’संकल्प’ नक्कीच निश्चित करा. नवीन वर्षात सुव्यवस्थित आर्थिक घडी बसविण्यासाठी तुमच्या गतवर्षातील आर्थिक ताळेबंदांचा आढावा घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
वर्ष 2022 मध्ये आर्थिक वृद्धीसाठी तुमचे नवे गुंतवणुकीचे संकल्प करण्यापूर्वी तुमच्या मागील कामगिरीचा निश्चितच आढावा घ्या. वर्ष 2020 आणि वर्ष 2021 कोविड प्रभावित वर्षातील तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन करा. तुमच्या नियोजनासाठीच्या वेळेपैकी 75% वेळ यासाठी खर्च करा.
तुमच्या खर्चात वाढ झाली आहे का? तुम्ही आर्थिक उद्दिष्टे गाठली आहेत का? तुमचे उत्पन्न आणि खर्चावर कोविड-19 महामारीचा नेमका काय परिणाम झाला. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नव्या वर्षात वास्तववादी आर्थिक संकल्प निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरतील.
सहा ‘अर्थ’संकल्प
संभाव्य मोठ्या खर्चांसाठी पूर्वनियोजन
महिन्यातील एक दिवस आर्थिक नियोजनासाठी राखीव
आधी खरेदी-नंतर देय धोरण टाळा
तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा नियमित आढावा
आरोग्य विमा घ्या
मागील दोन वर्षात अनेकांनी एकाधिक स्टॉक्स आणि क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली असेल. गेल्या वर्षी अनेक नवीन फंड तसेच आयपीओ देखील बाजारात दाखल झाले आहेत. तुम्हाला एकाधिक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यास अडचणीचे ठरु शकते. कमी वेळेत अधिक परताव्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मर्यादित स्टॉक्सवर लक्ष्य केंद्रित करा. सरलीकृत इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमुळे वर्षाच्या अखेरीस कर-भरणा प्रक्रिया सुलभ होते. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेण्याचा संकल्प नव्या वर्षात नक्कीच करा. क्रिफ्टोकरन्सीत गुंतवणूक करताना काळजीपूर्वक आखणी करा. इतरांचे अनुकरण शक्यतो टाळा.
कोविडचा प्रादूर्भाव अद्याप कमी झालेला नाही. नोकरदार व्यक्ती अद्यापही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीसाठी कंपनीच्या ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीवर अवलंबून आहेत. मात्र, कुटुंबातील सदस्यांसाठी पॉलिसी कव्हर पर्याप्त असल्याची खात्री करा. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे किमान तीन महिन्यांसाठी रोख पैसे किंवा मुदत ठेवींचा उपलब्धचा आवश्यक आहे.
तुमची गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांचे मूल्यमापन करण्यासाठी महिन्यातील एक दिवस राखीव ठेवा. तुमचे बँक स्टेटमेंट, प्रस्तावित देय तारखा, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट यांचा महिन्यातून किमान एकदा आढावा घ्या. महिन्यातील सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद डायरी/एक्सेल वर्कशीटमध्ये करा.
सुट्यांमधील भटकंती, इन्श्युरन्स प्रीमियम्स, शालेय फी, होम इंटेरिअर यांच्यासाठी वर्षभरात खर्च अपेक्षित असतात. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच त्यासाठी तरतूद करा. वैयक्तिक कर्जातून त्यासाठी तरतूद करण्याची आवश्यकता भासू देऊ नका. अन्यथा तुमचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही.