विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जळगावमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला आहे.
भारतीय जनता पक्षाने आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जळगावातील कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. या अनुषंगाने लाडवंजारी आणि ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात फडणवीस यांच्या पोस्टर्स समोर टरबूज फोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.माजी मंत्री पंकज मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवार नाकारली आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी केला. देवेंद्र फडणवीस व चंद्रकात पाटील यांच्या विरोधात आकाशवाणी चौकात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.