संदीप पाटील यांची सदस्यपदी निवड
महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी पालक समुपदेशक तथा शिक्षणतज्ज्ञ देवयानी मनोज गोविंदवार यांची नियुक्ती झाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची यादी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे. बाल कल्याण समिती ही 17 वर्ष वयाखालील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकास,पुनर्वसन आणि सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी -बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 – नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर काम पाहते. दर तीन वर्षांनी कार्यकाळ संपल्यावर नवीन समिती गठीत करण्यात येते. शासनातर्फे नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंडळाकडून मुलाखत घेऊन समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते. राज्यशासनाने जळगाव जिल्ह्याच्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून देवयानी मनोज गोविंदवार, सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते संदीप निंबाजी पाटील, विद्या रवींद्र बोरनारे, वैशाली सूर्यकांत विसपुते, वृषाली श्रीपाद जोशी यांची नियुक्ती केली आहे.