महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता

महागाईचा फटका बसलेल्या जनतेला येत्या काही महिन्यांत आणखी त्रास सहन करावा लागू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात होणाऱ्या आर्थिक आढावा बैठकीत रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ करू शकते. परदेशी ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने शुक्रवारी हा दावा केला आहे. झी न्यूज हिंदीने याबाबत वृत्त दिलं आहे.

RBI ने मे महिन्यात रेपो दरात वाढ केली

मे महिन्यात आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने दरात वाढ केली होती. ब्रोकरेज कंपनीने शुक्रवारी अहवालात म्हटले आहे की, मे महिन्यातही महागाईचा आकडा 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आणखी अनेक पावले उचलणे अपेक्षित आहे.

पुढील आठवड्यात 0.40 टक्के वाढ होऊ शकते

अहवालानुसार, आरबीआय पुढील आठवड्यात रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ करू शकते. याशिवाय, ऑगस्टमध्येही ते 0.35 टक्क्यांनी दर वाढवू शकते. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.25 टक्के दर वाढ करण्याचे ठरवू शकते. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच सांगितले की, चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेटमध्ये आणखी एक वाढ ही मोठी गोष्ट नाही.

रेपो दर वाढल्यास काय होईल?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होईल. कारण बँकांच्या कर्जाची किंमत वाढेल. रेपो रेट हा दर आहे ज्यावर बँका RBI कडून पैसे घेतात. हा दर वाढल्यावर बँकांना जास्त दराने कर्ज मिळेल. त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्त दराने व्याजही घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.