देशात कोरोनाचा उद्रेक

शुक्रवारी 84 दिवसांनंतर 24 तासांत देशभरात कोरोना व्हायरस संसर्गाची 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच त्याचा शोध आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तमिळनाडूसह पाच राज्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाबाबत पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे आणि संसर्ग झालेल्या लोकांच्या गटावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि पुरेशा संख्येत कोरोना संसर्गाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना लिहिलं पत्र

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या पत्रात म्हटले आहे की, ‘अशी अनेक राज्ये दिसत आहेत. जिथे काही काळापासून कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने दिसून येत आहेत. अशा प्रकारचे कोरोना संसर्ग स्थानिक पातळीवर पसरण्याची शक्यता दर्शवत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना महामारीशी लढत असताना सार्वजनिक आरोग्यासाठी वेगाने काम केले पाहिजे.

पाचपट वेगाने कोरोनावर नियंत्रण मिळवा

राजेश भूषण यांनी राज्यांना त्यांची रणनीती पाचपट वेगाने पसरवण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये कोरोना बाधितांच्या चाचणी-ट्रॅक-उपचार आणि लसीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. ते म्हणतात की नवीन कोरोना बाधित प्रकरणांचे निरीक्षण मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले पाहिजे आणि त्याच वेळी राज्यांनी त्यांच्या कोरोना चाचण्यांची संख्या देखील वाढवली पाहिजे.

गेल्या आठवड्यापासून प्रकरणे वाढत आहेत

राजेश भूषण सांगतात की, गेल्या 3 महिन्यांपासून भारतात कोरोनाच्या संसर्गाच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्याचवेळी, गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. ते म्हणतात की 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 प्रकरणे नोंदवली गेली, जी 3 जून रोजी 21,055 वर गेली.

महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय

राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार 134 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 763 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. या पत्रात केंद्र सरकारने राज्याला रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. त्यानंतर मुंबईत महापालिका आयुक्तांनी देखील आरोग्य यंत्रणेला पत्र पाठवत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात काल दिवसभरात 1134 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 763 रुग्ण आढळले आहेत. राज्यात दिवसभरात 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी मुंबईतील 352 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 3735 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यापाठोपाठ ठाणे, पुणे आणि रायगडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.