भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यातील सततच्या घसरणीतून सावरला असून या आठवड्यात सलग तिसऱ्या सत्रात तेजीची अपेक्षा आहे. आजही बाजारात तेजी कायम राहिल्यास सेन्सेक्स 55 हजारांचा टप्पा पार करु शकतो. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 1,300 अंकांच्या वाढीसह 54,318 च्या पातळीवर पोहोचला होता, तर निफ्टी 400 अंकांच्या वाढीसह 16,259 वर बंद झाला होता. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी नफा मिळवू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारातूनही बाजारात तेजी येण्याची चिन्हे आहेत, तर LIC च्या लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
अमेरिका आणि युरोपीय बाजारात तेजी
महागाई नियंत्रणात येईपर्यंत व्याजदर वाढतच राहतील, असे यूएस फेड रिझर्व्हचे नेते जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात पॉझिटिव्हिटी दिसली आणि शेवटच्या ट्रेडिंग सत्रात प्रमुख स्टॉक एक्स्चेंज Nasdaq 2.76 टक्क्यांनी वाढला.
अमेरिकेशिवाय युरोपीय बाजारातही आज तेजी दिसून येत आहे. युरोपचे मुख्य स्टॉक एक्स्चेंज जर्मनीवर 1.59 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे, तर फ्रान्सचे स्टॉक एक्स्चेंज 1.30 टक्क्यांनी उसळी घेत आहे. लंडन स्टॉक एक्सचेंज देखील तेजीसह बंद झाला आणि 0.72 टक्क्यांनी वाढ झाली.
आशियाई बाजारातही तेजी
अमेरिका आणि युरोपीय बाजारातील वाढीचा परिणाम आशियातील शेअर बाजारांवरही दिसून आला. आज सकाळी उघडलेल्या आशियातील जवळपास सर्वच शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. जपानचा निक्केई 0.59 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे, तर तैवानचा बाजार 0.86 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. मात्र, काही बाजारात नुकसानही दिसून येत आहे. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.21 टक्क्यांनी, हाँगकाँग 0.74 टक्क्यांनी घसरले, तर चीनचे शांघाय कंपोझिटही 0.49 टक्क्यांनी घसरले.