केतकी चितळेच्या ट्वीटवरून
राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळे सध्या राज्याच्या राजकारणात सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्लोक प्रकारातून पोस्ट केलेल्या ओळींमधून शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला असताना केतकी चितळेविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी देखील केतकी चितळेला सुनावलं आहे. राज ठाकरेंनी ट्विटरवर खुलं पत्रच पोस्ट केलं आहे.
केतकी चितळे इतकी विकृत असेल
याची कल्पनाही करवत नाही
केतकी चितळे इतकी विकृत असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तिने काय लिहिले आहे ते लोकांनी वाचावे आणि तेच तुमच्या आजोबांबद्दल किंवा वडिलांबद्दल लिहिले तर काय वाटेल याचा विचार करा. ज्या माणसाचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले आहे त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या लढा. त्याला आम्ही उत्तर देतो. तुम्ही त्यांचा चेहरा कसा झालाय यावर बोलणार असाल तर उद्या आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तर तुम्हाला ओरडता येणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
औरंगजेबच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे
दात केव्हा तोडणार : नवनीत राणा
दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत. त्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन असे सांगितले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल,” असे नवनीत राणा म्हणाल्या.
१७ मे ला होणार दोन
युद्धनौकांचे जलावतरण
भारतीय नौदलात ठारविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असतांना, त्यांची जागा नवीन युद्धनौका घेत असते. काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईतील माझागाव गोदीमध्ये सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे. यापैकी विनाशिका आणि फ्रिगेट प्रकारातील दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १७ मे ला होणार आहे.
लातूरमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या
पाच महिलांचा बुडून मृत्यू
कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूरमध्ये समोर आली आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत. तलावावर कपडे धुताना अचानक एक मुलगी पाण्यात पडली. इथे असणाऱ्या दोन मुली आणि दोन महिलांनी बुडणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. दुर्देवाने या पाचही जणींचा बुडून मृत्यू झाला. अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे ही घटना घडली आहे.
पोटच्या मुलाला 2 वर्ष
20 कुत्र्यांसोबत कोंडून ठेवले
पोटच्या मुलाला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवणाऱ्या लदोरीया यांच्या घरावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या घरातून महापालिकेने 15 जिवंत कुत्र्यांची सुटका केली आहे. तर घरात 3 कुत्री मृतावस्थेत आढळून आलेत. या सगळ्या कुत्र्यांची रवानगी अॅनिमल शेल्टर होममध्ये करण्यात आली आहे. लदोरीया यांच्या घरातून 10 बॅगा कचरा सापडला आहे. मुलाला 22 कुत्र्यांसोबत डांबणाऱ्या आई-वडिंलाना अटक केली आहे. आई-वडिलांनी निर्दयीपणाचा कळसच केला.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर
प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहनांचा वेग मंदावला आहे. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खालापूर टोल नाका आणि बोर घाटात मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. दोन्ही लेन वरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. विकेंड आणि सलग लागून आलेल्या सुट्या यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आयपीएलमध्ये ६५०० धावांपर्यंत
मजल मारणारा विराट पहिला खेळाडू
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीने खराब खेळ केला. या हंगामात तो तीन वेळा एकही धाव न करताच तंबुत परतलेला आहे. असे असताना त्याचे क्रिकेट जगतातील स्थान अजूनही कायम आहे. त्याने पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये ६५०० धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.
SD social media
9850 60 3590