मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर संशयित रॉकेट पडल्याची बातमी पसरल्यानंतर खळबळ उडाली. स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोहालीतील पंजाब इंटेलिजन्स कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. बातम्यांनुसार, एक रॉकेटसारखी गोष्ट जमिनीवर आदळली आहे. या स्फोटामुळे तिसऱ्या मजल्यावरच्या काचा फुटल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हा स्फोट इतका जबरदस्त होता की यामुळे परिसराला मोठे हादरे बसले तसेच काही ठिकाणी घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या चे वृत्त आहे. मात्र या स्फोटांमध्ये कोणीही जखमी किंवा जीवित हानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही. त्यामुळे पोलिसांनी हा स्फोट म्हणजे केवळ धमकावण्याचा प्रकार असल्याचे सांगितलेले आहे त्यामुळे आता पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्याच्या मागे लागलेले आहेत.