अमेरिकेतील एका विद्यापीठांमध्ये FILM-300O: पोर्न अभ्यासक्रम सुरू होणार

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल. परंतु युनायटेड स्टेट्समधील एका कॉलेजमध्ये समर सेमिस्टरमध्ये पॉर्नचा कोर्स सुरू करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सॉल्ट लेक, उटाह येथील वेस्टमिन्स्टर कॉलेजने हा अभ्यासक्रम त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे जो सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

महाविद्यालयाच्या “FILM-300O: पोर्न” अभ्यासक्रमाच्या यादीमध्ये असे म्हटले आहे की वर्गातील विद्यार्थी एकत्र अश्लील चित्रपट पाहतील आणि “वंश, वर्ग आणि लिंग यांच्या लैंगिकीकरणावर चर्चा करतील” तसेच त्यांनी पोर्नोग्राफीला “प्रायोगिक, मूलगामी कला” म्हणून संबोधलं आहे.

वेस्टमिन्स्टरच्या क्लास कॅटलॉगवर या कोर्स संदर्भात काय पोस्ट करण्यात आलं आहे. हा अभ्यासक्रम पाहून एका वापरकर्त्याने म्हटले, “तर या कारणामुळे वेस्टमिन्स्टरची फी जास्त आहे.” दुसर्‍याने लिहिले, “वर्गात एकत्र पोर्नोग्राफी पाहणे हे पूर्णपणे आणि तीव्रपणे घृणास्पद आहे!!!”

कॉलेजने यासंदर्भात एक निवेदन जारी केले, त्यात असे म्हटले आहे: “कॉलेज ऑफ वेस्टमिन्स्टर कधीकधी सामाजिक समस्यांचे विश्लेषण करण्याची संधी म्हणून असे निवडक अभ्यासक्रम ऑफर करते. या विश्लेषणाचा एक भाग म्हणून, वेस्टमिन्स्टर कॉलेज आणि काउन्टीमधील विद्यापीठे अनेकदा पोर्नोग्राफीसारख्या संभाव्य आक्षेपार्ह विषयांची चौकशी करतात. या अभ्यासक्रमांचे तपशील, काही वाचकांसाठी धोकादायक असले तरी, विद्यार्थ्यांना वादग्रस्त विषयांच्या गंभीर तपासणीत सहभागी व्हायचे आहे की नाही हे ठरवण्यात मदत होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.