भारताचे नवीन लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे असणार आहेत. मनोज नरवणे यांच्या नंतर मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख बनणारे ते पहिले इंजिनीअर आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर मानले जात आहेत.
39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.
डिसेंबर 1982 मध्ये लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी लेफ्टनंट जनरल मोहंती यांच्याकडून लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला जे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.