मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसटी कर्मचाऱ्यांनी मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरु केल आहे. एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानात जाण्याची विनंती केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवलं.
पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्यभागी येऊन एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पोलिसांच्या तीन ते चार गाड्या घटना स्थळावर पोहोचल्या आहेत. पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई महापालिकेसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. पोलीस आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढतेय त्या प्रकारे त्यांना सुविधा मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. पोलिसांसमोर आंदलोकांना कसं आवरायचं हा प्रश्न आहे. पोलीस आता नेमकी कोणती भूमिका बजावणार आहेत, पाहावं लागणार आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.
मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी टॉयलेट आंदोलन सुरू केलं आहे. शेकडो एसटी कर्मचारी रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. भर रस्त्यात एसटी कर्मचारी शौचास बसल्यानं पोलिसांसह प्रशासनाची झोप उडाली होती. आझाद मैदान परिसरात शौचाची सोय, अंघोळीची सेय नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला कुठे शौचास जायचं असा सवाल विचारला आहे.