पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं ही योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन यांसंदर्भात महाहिती दिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर एक संदेश देखील दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 80 कोटी नागरिकांना लाभ झाल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. भारतवर्षाचं सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारनं या योजनेला मुदतवाढ दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अतंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे 80 कोटी नागरिकांना मोफत राशन दिलं जातं. या योजनेतील नागरिकांना रेशनकार्डवर मोफत राशन दिलं जातं. या योजनेद्वारे तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिला जातो.
केंद्र सरकारकडून देण्यात गरीब कल्याण योजनेद्वारे देण्यात येणार धान्य देशातील 80 कोटी नागरिकांना देण्यात येतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड आहे त्यांना धान्य मिळतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना या योजनेद्वारे धान्य मिळत नाही. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती.