दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत. मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपळी नाहीये. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजवेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक, असे म्हणताना ते दिसून येत आहे. त्यामुळे आता चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यावरून आक्रमक झाले आहे. त्यांनी तशाच शब्दात अग्निहोत्रींचा समाचार घेतला आहे.
दिग्विजय सिंह यांनी विवेकवर निशाणा साधत ट्विट केले आहे. दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे की, विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळी रहिवाशाचा नाही. मी 77 पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिला असाल त्यामुळे हा “संगतीचा प्रभाव असू शकतो”. व्हायरल होत असलेले विवेक अग्निहोत्री यांचे विधान केव्हा आणि कोणत्या संदर्भात ते म्हणाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर विविक अग्निहोत्री यांच्या बाजुने अजून कोणतीही प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण आलेले नाही.
विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रिलीज झाल्यापासून हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 13 दिवसांत 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटातील स्टारकास्टच्या अभिनयापासून ते विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे.‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून केजरीवाल यांनीही भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.