मुख्याध्यापकाने शाळेतच विद्यार्थ्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस शाळेत कापण्यात आले. मुख्याध्यापकाने सहा वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतच केस कापल्याचा आरोप आहे. तसंच त्याला नकोसा स्पर्श म्हणजेच “बॅड टच”ही केल्याचा दावा केला जात आहे. आरोपी मुख्याध्यापकाच्या विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुलासोबत घडलेल्या अश्लील घटनेचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनाही मुख्याध्यापकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुख्याध्यापकाने शाळेतच सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगा रडत रडत घरी गेल्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. अमरावती शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला.
विशेष म्हणजे मुख्याध्यापकाने चिमुरड्याला “बॅड टच” केल्याचाही दावा केला जात आहे. पालकांनी या प्रकरणी अमरावतीतील राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीच्या विरोधात पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुख्याध्यापकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुलासोबत घडलेल्या अश्लील प्रकाराचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनाही मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. ही शाळा कुणाची आहे हे तुला माहीत नाही, अशी धमकीही आरोपी मुख्याध्यापकाने दिल्याचा दावा आहे.