पुण्याजवळच्या ‘मर्सिडीझ बेंझ’ मध्ये अवतरला बिबट्या; 6 तासांच्या थरारानंतर सुटका
अलीकडे शहरात वन्य प्राणी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात अलीकडच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातही गवा, रानरेडा असे प्राणी आल्याच्या घटना ताज्या आहेत. वस्तीत शिरलेल्या वन्य प्राण्यांना सुखरूप त्यांच्या अधिवासात सोडणं हे मोठं आव्हान असतं. अशीच एक आव्हानात्मक कामगिरी पुणे वन विभागानं नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली आहे. या वेळी बिबट्याने चक्क मर्सिडीज बेंझ निवडली. या बड्या कार कंपनीच्या चाकणच्या शॉप फ्लोअरवरच तो पहाटे दिसला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर वन विभागाने आज (सोमवार, 21 मार्च) चाकणमधल्या मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनीच्या आवारात शिरलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका केली.
IPL मध्ये त्सुनामी आणणारा क्रिकेटर आता कुठे आहे? एका रात्रीत झाला होता स्टार
आयपीएलमध्ये (IPL) काही वर्षांपूर्वी एक खेळाडू रनची त्सुनामी घेऊन आला होता. त्याची वादळी बॅटिंग पाहून अनेकांना त्याच्यामध्ये भविष्य दिसलं, पण अवघ्या काही दिवसांमध्येच हा खेळाडू अचानक गायब झाला. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 63 बॉलमध्ये नाबाद 120 रनची खेळी करून पॉल वल्थाटी एका रात्रीमध्ये स्टार झाला. भारतीय क्रिकेट विश्वात वल्थाटीची जोरदार चर्चा होऊ लागली, पण नशिबाने साथ न दिल्यामुळे वल्थाटी मैदानाबाहेर फेकला गेला.
काळविट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खान याला जोधपुर न्यायालयाचा दिलासा
राजस्थान हाय कोर्टाकडून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. हाय कोर्टाने सलमान खानकडून केलेल्या ट्रान्सफर पिटीशनचा स्वीकार केला आहे. यानंतर आता सर्व प्रकरणात सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होईल. हाय कोर्टाच्या निर्णयानंतर सलमान खानला वारंवार दुसरीकडे जावं लागणार नाही.
‘त्यांच्या घरात कोण कुणासोबत…’ महाविकास आघाडीवर टीका करताना नितेश राणेंनी जीभ घसरली
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिल्यामुळे एकच राजकीय चर्चा रंगली आहे. तर महाविकास आघाडी व एमआयएमच्या युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील टीका केली आहे.आमदार नितेश राणे हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेवून देवीचा धार्मिक कुलाचार केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर टीका कली.
कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट; आता मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल
जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा कहर केला आहे. काही शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही कोरोनाच्या उद्रेकाबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे आता भारताने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.भारतात आता सर्वांना लवकरच तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोसही दिला जाणार आहे. मोदी सरकार कोरोना लशीचा बुस्टर डोस देण्याच्या विचारात आहे. सध्या भारतात फ्रंटलाइन वर्कर आणि 60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाच कोरोना लशीचा बुस्टर डोस दिला दातो आहे. रॉयटर्सने सूत्रांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, जगात कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. चीन, युरोपसह दक्षिण आणि पूर्व आशियातही कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार बुस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत.
वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं रचला इतिहास, लाराचा 18 वर्षांपूर्वीचा मोडला रेकॉर्ड
वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड यांच्यात ब्रिजटाऊनमध्ये झालेली दुसरी टेस्ट ड्रॉ झाली. ही टेस्ट ड्रॉ करण्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटचे महत्त्वाचे योगदान होते. पहिल्या इनिंगमध्ये 160 रन करणाऱ्या ब्रेथवेटनं दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. आता तिसरी आणि शेवटची टेस्ट 24 मार्च पासून ग्रेनेडामध्ये खेळली जाणार आहे.ब्रेथवेटनं एकूण 16 तास क्रिजवर घालवले. या काळात त्यानं 673 बॉलचा सामना केला. या खेळीच्या दरम्यान ब्रेथवेटनं त्याच्याच टीमचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. लारानं 400 रनच्या वर्ल्ड रेकॉर्ड खेळीच्या दरम्यान 582 बॉलचा सामना केला होता. लारानं तो रेकॉर्ड 2004 साली केला होता. त्यावेळी त्यानं गॅरी सोबर्स यांचा 575 बॉलचा रेकॉर्ड मोडला होता.
गोव्याचा मुख्यमंत्री ठरला! भाजप आमदारांच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब
गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच सावंत हे गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हे सर्वांनी मान्य केले.
मास्क घातलेले हॅकर्स ज्यांनी उडवलीय रशियाची झोप! असं करण्यामागे कारण काय?
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर एक सायबर हॅकर ग्रुप प्रसिद्धीच्या झोतात आला असून, तो रशियासाठी डोकेदुखी बनला आहे. या ग्रुपचे हॅकर्स सतत सायबर हल्ले करून खूप नुकसान करत आहेत. वास्तविक, अनामिक हा एक शक्तिशाली समुदाय आहे, जो सर्व अनामित ऑफलाइन आणि ऑनलाइन हॅकर्स आणि कार्यकर्ता समुदायांचे प्लॅटफॉर्म आहे. भारतातील काही हॅकर्स समुदायही या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संबंधित आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
SD Social Media
9850 60 35 90