अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली

आता कुठे कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाच्या नवीन विषाणूंचा धोका निर्माण झाला आहे. चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. जगामधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन या हाँगकाँग , दक्षिण कोरिया या देशांमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढली आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनी जपान येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. या सगळ्यामुळे कोरोनाची चौथी लाट येईल का अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा हा ओमायक्रोन बी 2 हा जो विषाणू सगळीकडं पसरत आहे. या व्हेरियंटची लाट नुकतीच आपल्या देशात येऊन गेली असल्याची माहिती आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1 सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो.मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

साधारण 70 च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असे मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.