युक्रेनच्या व्होलोडिमिर झेलेन्स्की
यांना शांततेचे नोबेल द्या
अनेक आजी आणि माजी युरोपियन राजकारण्यांनी नॉर्वेजियन नोबेल समितीला २०२२ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी युक्रेनच्या व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना नामांकन करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी नामांकन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. आम्ही समितीला यासंदर्भात विचार करण्यासाठी नम्रपणे आवाहन करतो. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युक्रेनच्या लोकांसाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनाची परवानगी देण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया वाढवा,” असं निवेदनात म्हटलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटची लाट
भारताने योग्य रीतीने हाताळली
चीन, दक्षिण कोरिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. या देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे या देशांमधील रुग्णसंख्या वाढल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारताने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली करोनाची लाट योग्यरित्या हाताळल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. सरकारने सांगितले की, मोठ्या प्रमाणात लसीकरण कव्हरेज आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालीत करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे देशात ओमायक्रॉनचे चांगले व्यवस्थापन झाले.
पाकिस्तानची चाचणी चुकली,
क्षेपणास्त्र भरकटले
पाकिस्तानमधील सिंध प्रातांमधील जमशोरो येथील नागरिकांना आकाशातून वेगाने जमीनीकडे येणारी ही वस्तू एक क्षेपणास्त्र असल्याचं लगेचच सर्वांच्या लक्षात आलं आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी लष्कराच्या या चाचणीचे निकाल नकारात्मक आलेत. कारण क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानंतर काही सेकंदांनंतर ते नियोजित मार्ग सोडून भरकटलं. नियोजित लक्ष्य भेद करण्याआधीच हे क्षेपणास्त्र खाली पडलं. सिंधमधील ठाणा बुला खान येथे हे क्षेपणास्त्र पडलं. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाचं वृत्तांकन केलं असलं तरी या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही. सकाळी ११ वाजता ही चाचणी होणं अपेक्षित होतं. क्षेपणास्त्राच्या टान्सपोर्टर इलेक्टर लॉन्चरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने चाचणी संध्याकाळी घेण्यात आली. यातूनच गोंधळ झाला.
ISKCON मंदिराची ढाकामध्ये
अज्ञातांनी केली तोडफोड
बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये गुरुवारी ISKCON मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढाक्याील वारी परिसरातल्या लाल मोहन साहा रोडवर इस्कॉनचं राधाकांत मंदिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी या मंदिरात अचानक काही लोकांचा जमाव दाखल झाला आणि त्यांनी मंदिराच्या काही भागाचं नुकसान केलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार या घटनेमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामध्ये सुमांत्रा चंद्र श्रावण, निहार हलदर, राजीव भद्र अशी काही जखमींची नावं आहेत.
कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल
१०६ डॉलरच्या जवळ पोहोचला
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असली तरी कच्च्या तेलाच्यात दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कार्यालय क्रेमलिनेने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेवर शंका व्यक्त केल्यामुळे तेलबाजारात जास्तच अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचा दर सध्या प्रतिबॅरल १०६ डॉलरच्या जवळ पोहोचला आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना
दिली व्हाय दर्जाची सुरक्षा
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचं कडं यापुढे विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतामध्ये विवेक अग्निहोत्री यांना ही सुरक्षा पुरवली जाणार आहे,’ असं सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय.
त्यांचे भाजपा आमदार कमी
झालेत : छगन भुजबळ
ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार” असंही फडणवसांनी बोलून दाखवलं. यावर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी देखील त्यांना सव्वा दोन – अडीच वर्षे थांबावं लागेल. जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच सरकार येईल ना? मात्र आता तरी सध्या तसं काही चित्र दिसत नाही. चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये ५० पेक्षा जास्त त्यांचे(भाजपा) आमदार कमी झालेले आहेत.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री
नाही भाजपची चिंता करू नये
वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये,” असा टोला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी जशास तसे उत्तर देताना राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान गुरुवारी दिले होते. पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी दोन बैठका झाल्या, त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला. त्यावरुनच आता भाजापाचे नेते आणि महाराष्ट्र भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
१०१ वेळा भोसकून शिक्षिकेची हत्या,
अपमानाचा असा घेतला बदला
शिक्षिकेने तीन दशकांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय आरोपीने या हत्येची कबुली दिली आहे. २०२० मध्ये या व्यक्तीने प्राथमिक शाळेत आपली शिक्षिका राहिलेल्या महिलेची हत्या केली होती. बेल्जियममध्ये ही घटना घडली असून गुरुवारी सरकारी वकिलांनी याची माहिती दिली. Gunter Uwents असं या आरोपीचं नाव आहे. शिक्षिका मारिया व्हर्लिंडेन यांनी १९९० मध्ये आपल्यावर केलेली कमेंट विसरु शकलो नव्हतो. त्यावेळी आपण सात वर्षांचे होतो. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, १०१ वेळा भोसकून मारिया यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पाकिटात असणाऱ्या पैशांना हात लावला नसल्याने चोरीच्या उद्धेशाने हत्या झाली नसल्याचं स्पष्ट होतं.
येत्या 48 तासात विदर्भात धडकणार Heat Wave; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या 48 तासात विदर्भातील बहुतांशी भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
SD social media
9850 60 35 90