पुण्यातील खराडीमधील कोट्यवधींच्या भूखंडाच्या श्रीखंडासाठी भाजपच्या माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं मध्यस्थी केल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळं किरीट सोमय्यांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानं भाजपचीही अडचण झाली असल्याचं समोर आलंय.महापालिकेची जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जातीय, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. किरीट सोमय्यांनी त्यांसदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र लिहीलं होतं.
भाजपच्या माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं पालिकेवर दबाव आणत जागा खासगी बिल्डरला देण्यासाठी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळं भाजपची अडचण झाल्याची चर्चा सुरु झालीय. एक्झिबिशनसाठी आरक्षित जागा खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलीय.
खराडीमधील सर्व्हे नं 53 आणि 54 15 हजार 779 चौरस मीटरचा हा भूखंड आहे.
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी 15 मार्च 2022 ला पुणे माहपालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात पुणे पेठ येतील खराडी सर्व्हे नंबर 53 पार्ट, 54 पार्ट येथील डीसीपीआर नियम 21.11 समायोजन आरक्षण तत्व अन्वये एक्झिबिशन ग्राऊंड म्हणून आरक्षित असलेली जागा विकसनासाठी देऊन घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.
मूळ ले-आऊट समंतीपत्र क्रं. 1652/10 मध्ये गोंधळ गडबड करुन खाजगी विकासासाठी देण्याचा प्रस्ताव गैरकायदेशीर रित्या पुणे महापालिका आयुक्तांनी मजूर केला आहे. त्या प्रकरणाची चौखशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. राज्य सरकार व महापालिका आयुक्त गैर कायदेशीर पद्धतीनं करोडो रुपयांचा प्लॉट हा कोलते पाटील रिअल इस्टेट प्रा. लि. बिल्डरला ट्रान्सफर करत आहे. या संबंधी घोटळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.