आज दि .११ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

काँग्रेसमध्ये दोन गट, सोनिया गांधी
लवकरच बोलावणार बैठक

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी संकेत दिले आहेत की पक्षाची पुढील वाटचाल कशी असावी यासंदर्भातील चर्चेसाठी पक्षाच्या कार्य समितीची बैठक लवकरच बोलवण्यात येणार नाही. मात्र अनेक नेत्यांना यासंदर्भात काहीच कल्पना नसल्याची माहिती समोर येतेय. पंजाबमधील आपच्या दमदार विजयानंतर काँग्रेसमधील काही तरुण नेत्यांनी काँग्रेसमधील ‘जुन्या आणि थकलेल्या’ नेत्यांनी आता तरुणांसाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी केलीय.

राज्याच्या कृषी क्षेत्रातही
४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आता या अर्थसंकल्पातून राज्यातल्या सामान्य माणसाला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

राज्यात CNG स्वस्त; अर्थमंत्री
अजित पवारांची मोठी घोषणा

पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो, CNG वर चालणाऱ्या वाहनांना फायदा होतो. मूल्यवर्धित कर VAT चा दर हा १३.५टक्क्यांवरून टक्के वरून ३ टक्के करायचा प्रस्ताव आहे. यामुळे ८०० कोटी महसुली घट होईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल. परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दीनानाथ मंगेशकर संगीत
विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी राखून ठेवला असल्याची घोषणा त्यांनी केली. ”महाराष्ट्र सरकारने लता दिनानाथ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली.

राज्याची आगामी दिशा दाखवणारा
अर्थसंकल्प – मुख्यमंत्री ठाकरे

आज उपमुख्यमंत्र्यांनी राज्याची आगामी दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्षे आपत्ती झेलत हे विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे, जे जे शक्य आहे ते करणार आहे, ठामपणे सांगू इच्छितो सर्वांच्या साक्षीने जनतेचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे, मला खात्री आहे जनता स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

भारतीय लष्कराचे चीता
हेलिकॉप्टर कोसळले

जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमधील बरूम भागात भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांचे शोध पथक बर्फाच्छादित भागात पोहोचले आहे. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आणि यामध्ये काही जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोन्याच्या दरांमध्ये
2000 रुपये घसरण

जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून येत होती. परंतू युद्ध काहीसे थंडावल्याने आता पुन्हा सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आजच्या सोन्याचे भाव 53156 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे भाव 70580 रुपये प्रति किलो रुपये इतके होते. जळगाव येथील सुवर्ण बाजारातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजी दिसून येत होती. आज सोन्याच्या दरांमध्ये 2000 रुपये प्रति तोळे इतकी घसरण झाली आहे तर, चांदीच्या दरांमध्ये 3000 रुपये प्रति किलोने घसरण नोंदवण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी
पावसामुळे आंब्याचा मौसम धोक्यात

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात सध्या आंब्याच्या पिकाचा मोसम सुरू झाला आहे. अनेक बागांमध्ये तो काढणीला आला आहे, तर अन्य ठिकाणी मोहोर किंवा बारीक कणीच्या स्वरुपात आहे. यापैकी तयार आंब्यासाठी हा पाऊस त्रासदायक नाही, पण इतर अवस्थांमध्ये असलेला आंबा गळण्याचे किंवा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत. सध्या हापूसची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. पावसामुळे हे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.