जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची ऑईल रिग ओएनजीसीकडे सुपुर्द

गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पुर्व भागातील ओएनजीसीच्या मार्फत तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. सध्याच्या काळात महागलेल्या इंधनदराच्या काळात तर भारतीय भूमीत तेल मिळवण आणि त्याचे उत्पादन वाढवणे हे दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑईल (Oil) ड्रिलिंग रिग नुकतीच आंध्रप्रदेशातील भीमावरम येथे ओएनजीसीकडे सुपुर्द केली. ह्या नवीन ड्रिलिंग रिग मूळे ऑइल आणि गॅसचे उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखिल बचत होते. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळते.

जगात सर्वात मोठ्या क्षमतेची म्हणजेच २००० एचपी क्षमतेची ही ड्रिलीग रिंग जमीनीवरच्या तेल विहीरीसाठी उत्खनन करणार आहे. आता पर्यत MEIL ने १० रीगचा पुरवठा ओएनजीसीला केला आहे. त्यातील तीन कार्यान्वीत सुध्दा झाल्यात तर इतर ७ रीग पुढच्या ४ ते ५ आठवड्यात ओएनजीसीच्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत होतील.

विविध क्षमतेच्या एकूण ४७ रीग्ज MEIL ओएनजीसीला पुरवणार आहे. कोव्हीड काळात देखील या रीग्जचा पुरवठा शक्य तेवढ्या लवकर करण्यात आला. के. सत्य नारायण, MEIL चे तांत्रिक विभागाचे प्रमुख यांनी सांगतीले की मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह उत्तम कार्यक्षमतेच्या तेल ड्रिलिंग रिग्स तयार करणारी MEIL ही भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे. ऊर्जेच्या किमती जसजशा वाढत जातात, तसतस आपल्या सर्वाना कळतय की प्रगत रिग भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी कीती महत्त्वपूर्ण असतात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.