आज ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस

प्रशांत दामले यांना मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता म्हणले जाते. त्यांच्या अभिनय कारककिर्दीला चाळीसहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रशांत दामले यांनी नाटकांचे जवळपास आठ हजारहून अधिक प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९७८ मध्ये सुरू झाली. ‘टूरटूर’ या मराठी नाटकापासून प्रशांत दामले दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. यात एका मद्रासी माणसाची त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या, त्यांनी अनेक चित्रपटही केले. मात्र तेथे त्याचे मन रमले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३७ चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला आहे. यातील “चार दिवस प्रेमाचे”, “जादू तेरी नजर”, “गेला माधव कुणीकडे”, “एका लग्नाची गोष्ट”, “ओळख ना पाळख”, “प्रियतमा”, “मोरूची मावशी”, “लग्नाची बेडी”, “लेकुरे उदंड झाली”, “शूss कुठं बोलायवं नाही”, “नकळत दिसले सारे” आणि “कार्टी काळजात घुसली” प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” हे प्रमुख आहेत. दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत काम केले आहे. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका मालिका फार लोकप्रिय झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी २००१ ला प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी ५ प्रयोग करायचे ठरवलं अर्थात त्याचं नियोजनहि केलं होतं. सकाळी ७ वाजता पहिला प्रयोग सुरु झाला तो रात्री ११.५५ ला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला. हा प्रशांत दामले यांचे लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाले. यात गेला माधवचे २ प्रयोग, एका लग्नाची गोष्ट १ आणि चार दिवस प्रेमाचे २ प्रयोगांचा समावेश होता. प्रशांत दामले यांना सुंदर आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. गायक-नट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात प्रशांत दामले यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. प्रशांत दामलेंनी झी मराठीवरील सारेगमप स्पर्धासुद्धा जिंकली होती. प्रशांत दामले हे उत्तम निवेदक आहेत. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे, मुळातच खाण्याची आवड असलेले प्रशांत दामले गेली काही वर्ष झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाचे खमंग सूत्रसंचालन करतात. २०१९ मध्ये प्रशांत दामले यांचे ‘तु म्हणशील तसं’ नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे.

संजीव वेलणकर,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.