‘लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते. या कार्यक्रमात मुग्धा सर्वात तरुण सदस्य होती आणि सर्वांनी त्याला ‘लिटल मॉनिटर’ म्हणून संबोधले होते. पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असलेली मुग्धाचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबाग येथे झाले. त्यानंतर विज्ञान विषयाची आवड असल्याने तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढच्या शिक्षणासाठी नंतर ती मुंबईत आली. ती मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण पुर्ण केले. विज्ञान शाखेतूनच शिक्षण पुर्ण केले असले तरी ती शास्त्रीय संगीतात करिअर करणार आहे. लिटिल चॅम्प्सच्या लोकप्रियतेमध्ये अडकून न राहता मुग्धा वैशंपायनने शास्त्रीय संगीताची साधना अखंड चालू ठेवत या ही क्षेत्रात तितक्याच सहजतेनं सादरीकरण करते. गुरूकडून मिळालेले ज्ञान, परिश्रम, आणि कलेवरील श्रद्धा यांच्या जोरावर ती आज आघाडीच्या शास्त्रीय गायकांमध्ये गणली जाते. ती पंडिता सौ. शुभदाताई पराडकर यांचेकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेत असते.
मुग्धाला रायगडभूषण, कलाभूषण, शाहू मोडक पुरस्कार या बरोबरच २०१६ मध्ये भारत गायन समाज, पुणे या प्रतिष्ठित संस्थेकडून “माणिक वर्मा पुरस्कार” हा शास्त्रीय सांगीतासाठीचा पुरस्कार
२०१७ मध्ये षण्मुखानंद संगीत सभा, सायन, मुंबई या प्रतिष्ठीत संस्थेकडून “षण्मुखा संगीत शिरोमणी” हा शास्त्रीय संगीताचा पुरस्कार, २०१८ मध्ये वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौंडेशन, पुणे यांजकडून वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार, २०१८ मध्ये झी २४ तास कडून मानाचा “नवोन्मेष सन्मान, कोकण कल्याण महोत्सव तर्फे कल्याण कोंकण रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मुग्धा ने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर तसेच दुबई अनु अबुधाबी येथे यशस्वी दौरे केले आहेत. मुग्धाचं ‘मुग्धा वैशंपायन ऑफिशियल’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे. लवकरच ‘लिटिल चॅम्प’ हा लोकप्रिय कार्यक्रम परत चालू होत असून एके काळी जी स्पर्धक होती ती मुग्धा वैशंपायन आता परीक्षक म्हणून आपल्याला दिसणार आहे.
मुग्धा वैशंपायन हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा….!
संजीव वेलणकर, पुणे