अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. अक्षय कुमार ‘राम सेतु’ सिनेमाचं शूटिंग करत होता. त्यानंतर आता सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आलं आहे.
शंभर जण ‘राम सेतु’च्या सेटवर आज कामाला सुरुवात करणार होते. मडमधील सेटवर हे सर्व ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगच्या कामाला सुरुवात करणार होते. मात्र अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एंप्लॉइज (FWICE) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, ” राम सेतु सिनेमाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. दूर्दैवाने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्व क्वारंटाइन आहेत.”
सिनेमाचं शूटिंग बंद
अक्षय कुमारसह 45 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारं ‘राम सेतु’ सिनेमाची शूटिंग बंद करण्यात आलं आहे. जवळपास 15 दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो राम सेतुचं शूटिंग करत होता.