तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. वन्यजीव आणि वनस्पती यांच्याबाबत जागृकता वाढविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याची सुरुवात थायलंडमध्ये झाली. 1970 च्या दशकात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले होते. चोरटा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. वन्यप्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर होते. वनस्पतींचीही कत्तल केली जात होती. या पार्श्वभूमीवर जगानं चिंता व्यक्त केली. यासंदर्भात जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीव दिवस ठरविला.
तीन मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या 2013 च्या अधिवेशनात जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषीत करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी वन्यजीवांचे रक्षण, संवर्धनावर चर्चा केली जाते. अन्यखाखळीतील वन्यजीवांचे महत्त्व समजावून सांगितले जाते. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय स्थितीबाबत मंथन घडवून आणले जाते. तीन मार्च 1973 रोजी जागतिक वन्यजीवांसदर्भात खरी चिंता व्यक्त करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा पारीत केला गेला.
180 देशांनी वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा मान्य केला. स्थानिकांच्या मदतीनेच जंगली पशु-पक्ष्यांची शिकार होते. दुर्मीळ वनस्पतींचा चोरटा व्यापार होता. त्यामुळं याबाबत स्थानिकांची जनजागृती यानिमित्तानं केली जाते. निसर्गसाखळीतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्याचं जीवन निसर्गसाखळीसाठी का आवश्यक आहे, हे यानिमित्तानं समजावून सांगितलं जातं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत वन्यजीवांची परिस्थिती, अनुवंशिकता, वैज्ञानिक सौंदर्य यासंदर्भात अध्ययन करण्याचे ठरले.
2020 – पृथ्वीवर जीवन कायम राहीलं पाहिजे
2019 – पाण्याखाली जीवन-लोकांसाठी
2018 – मांजरी-शिकाऱ्यांमुळं धोक्यात
2017 – युवकांनो आवाज ऐका
2016 – वन्यजीवांचं भविष्य आमच्यासोबत
2015- वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर होण्याची गरज
अशा काही थीमवर जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.