तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये
अणवस्त्रांचा वापर होईल : रशिया
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक सूचक विधान केलं आहे. लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विध्वंसक असेल,” असं लावरोव्ह म्हटल्याचं आरआयए या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.
रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात
चीन सामील होणार नाही
रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात चीन युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन सरकारमध्ये सामील होणार नाही, असे चीनच्या बँक नियामकाने बुधवारी सांगितले. चीन हा रशियन तेल आणि गॅसचा प्रमुख खरेदीदार आहे. चीन बँकिंग आणि विमा नियामक आयोगाचे अध्यक्ष गुओ शुकिंग यांनी सांगितले की, बीजिंग अशा निर्बंधांना विरोध करते. “आम्ही अशा निर्बंधांमध्ये सामील होणार नाही, आणि आम्ही सर्व संबंधित पक्षांसोबत सामान्य आर्थिक, व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण ठेवू,” असे गुओ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. “आम्ही आर्थिक निर्बंधांना नाकारतो, विशेषत: एकतर्फी लाँच केलेल्या आर्थिक निर्बंधांना. त्याला जास्त कायदेशीर आधार नाही आणि त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत,” असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभा
उद्या ५७ जागांसाठी मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उद्या (गुरुवार) ५७ जागांसाठी मतदान होणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यासारख्या राजकीय दिग्गजांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सहाव्या टप्प्यात पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूरपर्यंतच्या जागांवर राजकीय संघर्ष होणार आहे. ४०३ पैकी २९२ जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले आहे
सरकार राज्यघटनेचा अवमान
करतंय : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रच नव्हे, देशाच्या इतिहासात जे घडलं नाही, ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. बॉम्बस्फोटाचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत थेट व्यवहार करून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आख्खं राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिलं आहे. दाऊद इब्राहिमला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला, त्यांना वाचवायला आख्खं सरकार उभं राहिलं आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतर देखील मंत्रीपदावर ती व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे हा राज्यघटनेचा अवमान सरकार करतंय”, असं फडणवीस म्हणाले.
मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
ठाकरे सरकारने घ्यावा : भुजबळ
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक भाजपामधील आरोप प्रत्यारोप अधिक टोकाचे झालेत. मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा ठाकरे सरकारने घ्यावा अशी मागणी भाजपाने केलीय. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी सागितले.
पाकिस्तानी, तुर्की विद्यार्थी देखील
भारतीय ध्वजाचा आधार घेताहेत
रशियाकडून युक्रेवर हवाई हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियासमोर शरणागती पत्कारण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. परिणामी युक्रेनचं रुपांतर सध्या युद्धभूमी झाल्यासच पाहायला मिळत आहे., युक्रेनमधील युक्रेनियन नागरिकांसह अन्य देशांच्या नागरीक मिळेल त्या मार्गाने आणि युक्रेन सोडत आहेत. अन्य देशांचे नागरीक मायदेशी परतण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थी व नागरीक सुखरूप परतले आहेत. दरम्यान, युद्धभूमी युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थी हे देखील भारतीय ध्वजाचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे
NSE IFSC ला निवडक अमेरिकन
स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येणार
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूशखबर आहे. NSE IFSC ला निवडक अमेरिकन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली आहे. एनएसई आयएफएससी एएसईचं आंतराष्ट्रीय एक्सचेंज आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मद्वारे यूएस स्टॉक खरेदी करू शकतील. या प्लॅटफॉर्मवर ५० स्टॉक खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
जयंत पाटलांनी कॅटबरी
सदाभाऊ खोत यांना भरवली
महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती नेहमी टीका करणारे रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कॅटबरी भरवल्याने ‘कुछ मिठा हो जाए’ची चर्चेने पुन्हा सांगली जिल्ह्यात जोर धरल्याचे पाहायला मिळाले. सांगलीच्या राजकारणात नेहमी टीका टिपणी केल्याचे पाहायला मिळते. सदाभाऊ खोत हे विरोधी पक्षात असल्यामुळे राज्याच्या प्रत्येक गोष्टीवरती टीका करताना पाहायला मिळते. पण काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील आणि रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे कट्टर विरोधक काल सांगलीच्या इस्लामपूर नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तिथं भरसभेत एका चिमुकलीने जयंत पाटील यांना कॅटबरी दिली. त्यावेळी जयंत पाटलांनी ती कॅटबरी लगेच सदाभाऊ खोत यांना दिल्याने उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला असल्याचे पाहायला मिळाले.
फेसबुकने महिनाभरात एक
कोटींहून अधिक तक्रारींची दखल
सोशल मीडियात आक्षेपार्ह व्हिडीओ आणि भडकावू मेसेज व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा मेसेज किंवा व्हिडीओमुळे काहींच्या भावना दुखावतात. त्यातून वातावरण कलूषित बनत असल्याच्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियात साईट्सकडून यासंदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. यात फेसबुकने आघाडी घेतली आहे. फेसबुक इंडिया या भारतातील अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया साइटवर देशात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर सोशल मीडिया कंपनी मेटाने जानेवारी महिन्यात एक कोटीहून अधिक कंटेंट पीसवर कारवाई केली आहे.
SD social media
9850 60 35 90