रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्ध सहाव्या दिवशी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे. सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरुच आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्हवर सुरु असणाऱ्या हवाई, जमीनीवर लष्कराकडून सुरु असणाऱ्या गोळीबारामध्ये भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. खार्कीव्हमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात भारतीय मुलगा मरण पावलाय
रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर
रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून हवेतून दीर्घकाळ ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी प्राणघातक बॉम्बचा वापर केला जात आहे. युक्रेनमधील रशियन हल्ल्याचे निरीक्षण करणाऱ्या मानवाधिकार गटांनी आणि युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूताने हा आरोप केला. या लोकांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे. एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.
राज्यपालांच्या बोलण्याचा
विपर्यास : रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असून माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे, ते योग्य नाही. परंतु, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही.
नवाब मलिक हेच दाऊदचे
फ्रंटमॅन : निलेश राणे
नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून वेगवेगळी नेतेमंडळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. एकीकडे आशिष शेलार, माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलेल असताना दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “कुणी सांगावं, नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंटमॅन असतील”, असं विधान निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून खळबळ उडाली आहे.
केदारनाथ धाम
भाविकांसाठी खुले होणार
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिवभक्तांसाठी एका आनंदाची बातमी समोर आली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत. आज (मंगळवार) महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पूजापाठानंतर केंदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे पीआरओ डॉ. हरीश गौर यांनी माहिती दिली.
युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष
पी. एन. जोशी यांचे निधन
बँकिंग व अर्थकारणातील गाढे अभ्यासक, युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण तथा पी. एन. जोशी यांचे मंगळवारी सकाळी सातारमध्ये राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कर्नाटकातील चिक्कोडी हे जोशी यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कोडीत तर माध्यमिकपर्यंतचे बेळगावात शिक्षण झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाची द्विपदवी घेतली. यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेत अर्थशास्त्र विभागात १५ वर्षे अधिकारी म्हणून नोकरी केली.
डॉक्टर लुटारू, आपटून मारायच्या
लायकीचे : संभाजी भिडे
संभाजी भिडेंनी करोनाची भीती डॉक्टरांनी पसरवल्याच्या आशयाचे वक्तव्य करताना डॉक्टरांवरच निशाणा साधलाय. अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाममध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी त्यांनी अपशब्दही वापरलेत. भाषणादरम्यान भिडेंनी, “तोंडावरचं काढ ते. गां× नाहीयस तू,” असं म्हटलं. त्यानंतर उपस्थित व्यक्ती हसू लागले. पुढे बोलताना संभाजी भिडेंनी, “करोना मुस्की (मास्क) बांधणं गां×पणाचं लक्षण आहे, डॉक्टरांना काय सांगायचं ते सांगू देत. डॉक्टर नालायक आहेत,” असंही म्हटलं. “डॉक्टर लुटारू आहेत. डॉक्टर ×××खोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका,” असंही संभाजी भिडेंनी म्हटलंय.
नवाब मलिकांचा मुलगा फराझ
यालाही समन्स बजावले
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स बजावण्यात आलं आहे.
युक्रेनमधून सुटलेल्या
विद्यार्थ्यांचे उन्मादी वर्तन
युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्ध संघर्षात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली असून लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वयासाठी जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडूनही लवकर सुटका व्हावी, यासाठी भारत सरकारकडे याचना केली जात आहेत. त्यातच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सुटलेले विद्यार्थी उन्मादी अवस्थेत दिसत आहेत.
युद्धामध्ये मानवी हक्काचे उल्लंघन, संयुक्त राष्ट्र महासभातील चर्चा
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपत्कालीन बैठकीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबले पाहिजे. युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या लष्करी कारवायांमध्ये वाढ झाल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन वाढले आहे.
SD social media
9850 60 3590