राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची घरी चौकशी केली, काही गोष्टीत ईडीला (ED) शंका आल्याने त्यांना तात्काळ नवाब मलिकांना ताब्यात घेतलं आणि दुपारी कार्यालयात आणलं. इक्बाल कासकर यांन नाव घेतल्याने नवाब मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यातं आलं होतं. पण बुधवारी सकाळी घरी मलिकांवरती कारवाई केली. त्यानंतर जे. जे रूग्णालयात तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केल्याची पाहायला मिळाले. तसेच भाजप ईडीचा चुकीचा वापर करीत असून हे सुडाचं राजकारण करीत असल्याचा आरोप उपस्थित अनेक समर्थकांनी तिथं नोंदविला.
अटक झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर आज महाविकास आघाडीतील अनेक नेते मंत्रायलय परिसरात धरणं आंदोलन करणार आहेत. भाजपचे नेते आज दिवसभरात मलिकांचा राजीनामा घ्यावा यासाठी आंदोलन करणार आहे. काल रात्री उशिरा इडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांना त्यांना पाठीबा त्रास असल्याने उशी-गादी देण्यात आली होती. तसेच त्याचे कुटुंबिय अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक ट्विट देखील केले आहेत.
नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर सकाळपासूनचं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी काल मलिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन केलं, तर भाजपचं हे असलं कारण चुकीचं असल्याचं अनेकांनी ट्विट म्हणाले आहेत. अनेक नेत्यांनी आमचं सरकार पाडण्यासाठी चुकीच्या पध्दतीने प्रयत्न केले जात असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे आज होणा-या घडामोंडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी असणा-या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ अनेक मंत्री धरणं आंदोलन करणार आहेत.