शिवजयंतीचे औचित्य, जुन्नर शहरात 19 ते 21 द्राक्ष महोत्सव

शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 या 3 दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांची विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

या ऐतिहासिक शहरात द्राक्ष महोत्सावाचे हे पाचवे वर्ष आहे. वर्षागणिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक महोत्सवाला भेट देतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होत असल्यामुळे याद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कला कुसर करणारे कारागीर, बचत गट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

या महोत्सवाचं 19 फेब्रुवारीलास सकाळी 11 वाजता उद्घाटन होईल. या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे.

या महोत्सवात पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली जाईल, जेथे पर्यटक आपल्या मित्र परिवारासोबत मजेशीर खेळ खेळून चांगला वेळ घालवू शकतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर 20 फेब्रुवारीलाआयोजित केली जाणार आहे. जुन्नरमधील देवराईंमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल.

“इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे, कारण ते इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही वाईन कशी बनते याची प्रक्रिया डोळ्यादेखत पाहून ती वाईन खरेदी करू शकतात. आमच्याकडे ब्लॅक करंट, मनुके आणि द्राक्षांच ताजा रस यांचा तुम्ही मधुर आस्वाद घेऊ शकता. त्याच पद्धतीने वेलीला लगडलेली द्राक्ष काढून तुम्ही ती विकत घेऊ शकता, त्यामुळे खरया पद्धतीने ऑरगॅनिक फळ तुम्ही आपल्या आरोग्याच्या करंडीत समाविष्ट करू शकता”,अशी प्रतिक्रिया उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.