अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च

मुंबई पालिकेने उंदीर (Rat) मारण्यासाठी केलेल्या 1 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत जोरदार आक्षेप घेतला. सत्ताधारी शिवसेनेने केलेला ‘मूषक खर्च’ म्हणजे सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असल्याची घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली. शिवसेनेने घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याचे सांगत गटनेते शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्षांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. उंदीर मारण्याच्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नाही. 12 प्रशासकीय विभागात उंदीर मारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली आहे. प्रस्तावामध्ये किती उंदीर मारले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? त्यांची उत्पत्तीस्थाने काय होती ? कायमस्वरूपी नेमक्या उपायोजना काय केल्या? त्याची कुठलीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

अनेक दिवस मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 69 (क) आणि कलम 72 अंतर्गत महापौर, महापालिका आयुक्त जो खर्च करतात त्यामध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीही वारंवार आर्थिक बाबींशी संबंधित या कलमांचा फायदा घेऊन सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात असून भारतीय जनता पक्षाचा याला तीव्र विरोध असून प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला.

क्षयरोगाचे निदान होण्यासाठी खात्रीशीर व योग्य निकाल देणारे 38 वे सीबीनॅट हे चाचणी संयंत्र आता शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सोमय्या रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या उपक्रमात विनामूल्य क्षयरोग निदान चाचणी केली जाणार आहे.

या संयुक्त उपक्रमामध्ये महानगरपालिकेने सीबीनॅट संयंत्र पुरविले असून रुग्णांच्या चाचणीसाठी लागणारे साहित्य (कीट) देखील महानगरपालिका पुरविणार आहे. तर सोमय्या रुग्णालयाने सीबीनॅट संयंत्रासाठी जागा दिली असून त्यात अनुरुप बदलदेखील रुग्णालयानेच केले आहेत. त्यासोबत क्षयरोग चाचणीसाठी रुग्णालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. सदर केंद्रामध्ये क्षयरोग निदान चाचणी करुन घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.