महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, यात 5 हजार 297 विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा 26 सप्टेंबर रोजी पार पडली होती, एकूण 79 हजार 774 उमेदवार परीक्षेला बसले होते. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 6.64 टक्के आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व काळजी घेत परीक्षा पार पाडण्यात आली होती.

मुंबई आणि पुणे शहरात तुलनेने उमेदवारांची उपस्थिती कमी असल्याचे पाहायला मिळाले. पात्र झाल्याचे ई-प्रमाणपत्र उमेदवारांना 4 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संकेतस्थळावर आपल्या लॉगीनवर जाऊन उमेदवारांना प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काम आणखी सोपे झाले आहे, विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://setexam.unipune.ac.in/ वर जा. या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल. यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा. यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा.

कोरोनाच्या काळात अनेकदा परीक्षा रद्द करण्याची वेळ अनेक विद्यापिठांवर आली होती, मात्र पुणे विद्यापीठाने योग्य खबरदारी घेत मोठ्या धाडसाडे ही परीक्षा पार पाडली होती. कोरोनाकाळात विविध शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या नुकसानीची सामना करावा लागला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाकडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं, परीक्षा सुरक्षित वातावरणात घडवून आणत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न पुणे विद्यापीठाने केला आहे. आणि आता निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बरोजगारी वाढली आहे. अशात विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे.

आता या परीक्षेचा निकाल लागल्याने हजारो विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर आणि मोकळा झाला आहे. हा निकाल जाहीर झाल्याने परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.