TATA ग्रुपची सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) आयटी सेक्टरमध्ये जगातील दुसरा सगळ्यात मौल्यवान ब्रॅन्ड म्हणून निवडण्यात आला आहे. Brand Finance 2022 Global 500 च्या यादीमध्ये Accenture नंतर TCS हा सर्वात मजबूत IT सेवा ब्रँड म्हणून उदयास आला आहे.
या यादीमध्ये जगातील मजबुत ब्रॅन्डला निवडले आहे. Top-500 Most Valuable Brand या यादीमध्ये भारतातून टॉप-१०० मध्ये भारतातील एकमेव टाटा कंपनी आहे. TCS स्वतंत्रपणे लिस्टमध्ये नाही, पण टाटा समूहाची कंपनी म्हणून समावेश आहे. या यादीत अॕपलची जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून निवड झाली आहे.
आयटी क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा दबदबा आहे. भारताची इन्फोसिस या बाबतीत टीसीएसच्या मागे आहे आणि जगातील तिसरा सर्वात मौल्यवान आयटी ब्रँड आहे. टीसीएस आणि इन्फोसिसने Brand Finance च्या या रॅकिंगमध्ये एक पाऊल पुढं टाकलं आहे. आणि आयबीएम सारख्या कंपनीला पाठिमागे टाकलं आहे. आयबीएम आता या यादीमध्ये जगातील चौथा मौल्यवान ब्रॅन्ड आहे.