कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर अधिकचा भर दिला जात आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनाशी लढण्यामध्ये काय महत्वाचे आहे हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीच्या मागणीत वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये ही मागणी अधिक वाढलेली आहे. नर्सरीमध्ये औषधी वनस्पतीची टंचाई निर्माण होत असून यावरुनच मागणीचे स्वरुप लक्षात येत आहे. गेल्या दीड वर्षात गुळवेल सर्वाधिक मागणी वाढली आहे.
वेगवेगळ्या नर्सरीमधून हजारो गुळवेलाची विक्री झाली आहे. एका-एका नर्सरीमधून हजारो वनस्पतींची विक्री झाली आहे. गिलोयशिवाय तुलसी आणि काळमेघलाही अधिकची मागणी होत आहे. गुळवेलमुळे मधुमेहावर नियंत्रण राहते व ते एकअँटी व्हायरल घटक असल्याचा दावा केला जात आहे. गिलॉयच्या रसामुळे रक्तातील साखर कमी होते, शिवाय पोटाच्या आजारांपासून सुटका होते. अॕनिमिया, कावीळ, रक्त कमी होणे, सांधेदुखी आणि दमा या आजारांवरही गिलॉय अत्यंत प्रभावी मानला जातो.
कोरोना दरम्यानच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास अधिकचे महत्व दिले जाते. गुळवेलमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतो, त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्याची विक्री अचानक वाढल्याचे नर्सरी ऑपरेटर बादल यांनी सांगितले. काळमेघ एक औषधी वनस्पती आहे, ज्याचा वापर अधिकची ताप आली तर केला जातो. मलेरिया, टायफॉइडसाठीही याचा वापर होतो. हे रक्त स्वच्छ करते म्हणून हे त्वचारोग आणि कुष्ठरोगाच्या उपचारांमध्ये देखील खूप उपयुक्त आहे. त्याशिवाय कडुनिंब, अश्वगंधा आणि जंगली हळद अशा अनेक वनस्पती असून, त्यांची मागणी वाढली आहे.
गुळवेलाचे महत्व लक्षात घेता याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेता मे 2021 मध्ये महाराष्ट्रातील एका आदिवासी गटाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गुळवेल पुरवण्याची ऑर्डर मिळाली होती. वैद्यनाथ, डाबर, हिमालय या कंपन्यांकडून ही ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 1 हजार 800 हून अधिक नागरिकांनी एकत्र काम केले होते. एवढेच नव्हे तर आदेश घेणाऱ्या कातकरी आदिवासी समाजाने कॉन्फेडरेशन ऑफ ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आपला व्यवसाय तर वाढवलाच, शिवाय नर्सरींची संख्याही वाढवली.
कोरोना काळात ज्या दुसऱ्या औषधी वनस्पतीची जास्त विक्री झाली ती म्हणजे तुळस. पवित्र तुळस आधीच काढा आणि चहामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा म्हणून वापरला गेला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अहवालातून याला दुजोरा मिळाला आहे. तेथे दरवर्षी साधारणतः 30 हजार तुळशीची रोपे विकली जात असल्याचे सांगण्यात आले. पण कोविड काळात 50 हजार तुळशी रोपांची विक्री झाल्याचा विक्रम आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये मुंबईचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे इतर शहरांमध्येही कोविडमुळे औषधी वनस्पतींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.