करोनाच्या काळातही भारतात सोन्याची आयात दुप्पट

चीन खालोखाल जगात भारतात सोन्याची आयात केली जाते. सोन्याच्या हा हव्यास भारतीयांना कधी सोडणार असा प्रतिसवाल विचारला जातो. कारण सोने 50 हजारांच्या घरात असतानाही त्याची मागणी काही कमी झाली नाही. भारतीयांचे सोन्यावरील प्रेम कायम आहे. दागिन्यांच्या हौसेने चालू आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत सोन्याची आयात दुप्पट झाली आहे. चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. प्रामुख्याने दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. भारतीयांचे हे वेड पाहून देशात पहिला सोने देवाण-घेवाणीचा पहिला एक्सचेंज सुरु करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सेबीच्या मंडळाने गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्यास मंजुरी दिली होती.

चालू आर्थिक वर्षात (एप्रिल-डिसेंबर 2021) पहिल्या 9 महिन्यांत देशाची सोन्याची आयात (Gold Import) दुपटीने वाढून 38 अब्ज डॉलरवर झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात ही वाढली आहे. या आयातीचा चालू खात्यातील तोट्यावर (CAD) परिणाम दिसून येतो. एप्रिल-डिसेंबर 2020 मध्ये सोन्याची आयात 16.78 अब्ज डॉलर होती. दागिन्यांच्या हौसेने सोने आयातीला झळाळी आली आहे. चीननंतर जगात भारत हा सोन्याचा दुसरा मोठा ग्राहक आहे. दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोन्याची आयात केली जाते.

आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये सोन्याची आयात 4.8 अब्ज डॉलरवर पोहोचली, जी वर्षभरापूर्वी याच कालावधीत 4.5 अब्ज डॉलर होती. आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे व्यापार तूट 142.44 अब्ज डॉलरवर गेली, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 61.38 अब्ज डॉलर होती. त्याचप्रमाणे आर्थिक आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत चांदीची आयात 2 अब्ज डॉलरवर पोहोचली, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 76.2 दशलक्ष डॉलर्स होती.

चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. देशात दागिने तयार करण्यासाठी प्रामुख्याने सोन्याची आयात होते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 71 टक्क्यांनी वाढून 2.9 दशलक्ष डॉलर्स झाली. चालू खात्यात निर्यात मुल्य आणि भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय वस्तू आणि सेवांच्या आयातीची, देवाण-घेवाणीची नोंद होते. सध्या चालू खाते तिमाही पूर्व आणि वर्ष पूर्वीच्या काळात अतिरिक्त स्थितीत आहे.

सेबीने देशातील पहिल्या सोन्याच्या देवाणघेवाणीची ब्लूप्रिंट सादर केली आहे. एक ग्रॅम सोन्याच्या किंमतीपेक्षा ही सोन्याच्या शेअरची किंमत कमी असेल आणि वायदे बाजारात खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणुकदारांना ते सहजपणे मोबाईल ॲप द्वारे खरेदी विक्री करता येतील, अशी व्यवस्थेची देशात रुजूवात करण्यात आली आहे. सेबीने देशात गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्याची शेअर बाजारांना मुभा दिली आहे. गेल्यावर्षी सेबीने याविषयीची मंजुरी दिली होती. आता या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोन्याच्या व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस चा वापर करण्यात येणार आहे. मूल्य निर्धारण करण्यासाठी एक निर्धारित पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. सोने खरेदीदाराला इलेक्ट्रॉनिक पावत्या देण्यात येणार आहेत. या पावतीचा व्यवहार एक्सचेंजवर करता येईल आणि तीच पावती जमा करून शुद्ध सोने ग्राहकाला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.