जन्म. ३० मार्च १९५१
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे त्यांचा जन्म झाला. अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून भीमराव पांचाळे यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण त्यांनी घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. मराठी गझलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गझलसागर संमेलने आणि गझल कार्यशाळा आयोजित करत असतात.
संजीव वेलणकर पुणे.