Realme GT2 सीरिजचे सर्व फोन 3 मिनिटात विकले गेले, कंपनीला 200 कोटींची कमाई

Realme ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एक इव्हेंट आयोजित केला आणि Realme GT2 आणि GT2 Pro या नवीन स्मार्टफोन्सचे अनावरण केले. दोन्ही डिव्हाइस आज चीनी बाजारात विक्रीसाठी खुले केले. दरम्यान, Realme GT2 सीरिजचे सर्व फोन 3 मिनिटात विकले गेले आणि कंपनीने 200 कोटींची कमाई केली

8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Realme GT2 च्या बेस मॉडेलची किंमत 2,599 युआन (रु. 30,312) आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,799 युआन (रु. 32,613) आहे. दुसरीकडे, 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,099 युआन (36,105 रुपये) आहे.

8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी Realme GT2 Pro ची किंमत 3,699 युआन (रु. 43,076) आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,999 युआन (46,567 रुपये) आहे. 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मॉडेलची किंमत 4,299 युआन (रु. 50,057) आहे, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 4,799 युआन (55,925 रुपये) आहे.

GT2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटने संचलित केला जातो. तर GT2Pro नवीन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC द्वारे संचलित केला जातो. दोन्ही डिव्हाइस डायमंड आइस कोअर कूलिंग सिस्टम प्लससह देखील येतात. हे स्मार्टफोन फोन 5,000mAh इतक्या बॅटरीने सुसज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.