व्हाट्सअपचे नवे फिचर, मॅसेज पाठविणा-याचा प्रोफाइल फोटो दिसणार

नवीन वर्षात पहिले फिचर घेऊन व्हाट्सअप यूजरवर गारुड करण्याच्या तयारीत आहे. मोबाईल स्क्रीनवर येणा-या नोटिफिकेशनमध्ये मॅसेज पाठविणा-याचा प्रोफाइल फोटो दिसणार आहे. नवीन व्हाट्सअप फिचर नोटिफिकेशनमध्ये प्रोफाईल फोटोला सपोर्ट करणार आहे. व्हाट्सअप नव-नवीन प्रयोग करत असते आणि युजरच्या सुरक्षेसह त्याला फ्रेंडली फिचरचे वेड लावत असते. त्यातीलचा हा नवा प्रयोग या वर्षात पहिल्यांदा करण्यात येत आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअपने यावर्षातील त्यांचे पहिले फिचर रोल आऊट केले आहे. सिस्टम नोटिफिकेशनमध्ये (System Notification) युजर आता सेंडरने पाठविलेल्या मॅसेज सोबत त्याचा प्रोफाईल फोटो ही पाहू शकणार आहे. व्हाट्सअप प्रोफाइल फोटो युजरला त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिसेल. सध्या हे फिचर अॅपल आयओएस (Apple iOS) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याची चाचणी सुरु असून अद्याप सर्व युजरसाठी त्याचा वापर करण्यात येत नाही. यामध्ये काही बग (Bug) आहे का, त्याची चाचपणी सुरु असून बग काढल्यानंतर हे फिचर अॅड्रॉईड(Android) युजरसाठी ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेव्हा सर्व युजर त्यांना आलेल्या मॅसेजच्या नोटिफिकेशनमध्ये सेंडरचा प्रोफाईल फोटो पाहु शकतील.

व्हाट्सअपच्या या भन्नाट प्रयोगाची माहिती दिली आहे ती, WaBetaInfo यांनी. WaBetaInfo व्हाट्सअपच्या विकसनशील आणि विकसीत फिचर, प्रयोगाची अपडेट युजर्सना देत असते. WaBetaInfo ने त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये या भन्नाट प्रयोगाची माहिती युजरसाठ शेअर केली आहे. नवीन माहितीनुसार, व्हाट्सअपची येऊ घातलेली नवी एडिशन नोटिफिकेशनमध्ये सेंडरचे प्रोफाइल फोटो दाखविण्यास सपोर्ट करेल. चॅट अथवा ग्रुपवर मॅसेज आला, तर सिस्टिम नोटिफिकेशनमध्ये सेडंरचा प्रोफाइल फोटो युजरला दिसेल. सध्या हे फिचर टेस्टिंगसाठी आयओएस 15 (iOS 15) आणि आयओएस 15 एपीआएस (iOS 15 APIs) मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे.

व्हाट्सअप लवकरच हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर सर्व युजरसाठी सुरु करण्याची योजना आखत आहे. या फिचरची चाचणी सुरु आहे. प्रोफाइल फोटो नोटिफिकेशनसोबत जोडणी करताना या अॅपला काही अडचणी येत आहे, त्या सोडविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

या व्यतिरिक्त व्हाट्सअप युजरसाठी अनेक नवीन फिचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये रिएक्शन देण्यासाठी इमोजी (Emojis) व्हाईस मेमो (Voice Memos) ग्रुप अॅडमिनला (Group Admin) जादा अधिकार मिळणार आहेत. तसेच ग्रुप मधील मॅसेज डिलीट (Messge Delete) करण्यासाठी वेळ वाढविण्याचा अधिकार त्याला मिळणार आहे. नवीन वर्षात हे सर्व फिचर लवकरच युजरच्या हाती असतील. त्यामुळे व्हाट्सअप वापरण्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.