पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीची घोषणा केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेचा 10 वा हप्ता (2000 रुपये) 1 जानेवारी 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेतंर्गत शनिवारपासून खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे.
सरकारकडे नोंदणी असलेल्या 82 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र ज्यांच्या खात्यामध्ये काही त्रुटी असतील त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. उत्तरप्रदेशसह काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी असल्याने पैसे जमा झालेले नाहीत. उत्तर प्रदेश – 82 टक्के, राजस्थान- 93 टक्के, गुजरात -86 टक्के, जम्मू काश्मीर -74 टक्के, छत्तीसगड-78 टक्के, आंध्र प्रदेश – 77 टक्के तर तामिळनाडूमधील 76 टक्के शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचले आहेत.
जर सरकारकडून पाठवण्यात आलेले पैसे खात्यात जमा होत नसतील तर काही अडचण असू शकते. पैसे जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यापूर्वी फंड ट्रान्फर ऑर्डर असा मॅसेज येतो. जर असा मेसेज असलेला नसल्यास अडचण असू शकते. मेसेज न आलेल्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. आपले नाव यादीत आहे की, नाही हे पाहण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावरून जावून पडताळणी करता येईल. http://pmkisan.gov.in/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची अपलोड करण्यात आली आहे.
संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘फार्मर कॉर्नर’ येथे क्लिक केल्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची यादी दिसून येईल. यात खातेदारांचा बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर किंवा आधार कार्डद्वारे पैसे मिळाले किंवा नाही हे पाहता येईल. संकेतस्थळावर जाऊन स्पेलिंगची पडताळणी करता येईल. बँक खाते आणि आधार क्रमांक यामध्ये बदल असल्यास पैसे जमा होत नाहीत. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती चूक दूर झाल्यानंतर पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. यामुळे आधार आणि बँक खात्यातील नावात एका अक्षराचा देखील बदल असल्यास पैसे मिळत नाहीत. यामुळे पैसे जमा होत नसल्यास आधार आणि बँक खात्यातील नाव सारखे असणे आवश्यक आहे. बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्यास यात राज्य, जिल्हा, तहसील, गट आणि आपल्या गावाचा शोध घेतल्यानंतर यादी येईल. यात कोणत्या शेतकऱ्याचे पैसे थांबलेले आहेत. याची यादी दिसून येईल. पीएम किसान योजना पूर्णपणे आधार कार्डाशी जोडण्यात आली आहे.