राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. दबक्या पावलांनी रुग्णवाढ होत असल्यामुळे त्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही आहे. मात्र वेळीच हा धोका ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णवाढीनं कमालीचा वेग पकडला आहे. कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा गुणाकार करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आकडेवारीतून पाहायला मिळालंय.

कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. सोमवारीही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली होती. देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागल्यानं प्रशासनही धास्तावलंय. सर्व यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आल्या आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा अशी स्फोटक आकडेवारी समोर येऊ लागल्याने पुन्हा धाबे दणाणले आहेत.

मागच्या 6 दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला असून मागचे सहा दिवस रोज नवे उच्चांक कोरोना रुग्णवाढीनं गाठले. मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाल्याचे समोर आले आहे, कारण एकट्या मुंबईतली आकडेवारी 1377 आहे, त्यामुळे ही गेल्या काही महिन्यातली स्फोटक वाढ आहे. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी तुफान गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपण यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे. राज्यात दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आज दिवसभरात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या 167 वर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.