केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज भाजपच्या एका आमदारावर हल्ला केला. दरम्यान पोलोसानी हस्तक्षेप केल्यानंतर या आमदाराला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. अरुण नारंग असे या आमदाराचे नाव आहे.
मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा आता कडेलोट होत असल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजपा आमदारावर हल्ला केला. इतकंच नाही, तर त्यांचे कपडेही फाडले. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.
कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेलं हे आंदोलन असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा आज कडेलोट पहायला मिळाला.