डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते.
अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटर चं स्वदेशी डिझाईन बनवेणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअर च्या विकास आणि डिफेन्स अॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये 1987 पासून योगदान देत आहेत.
अतुल राणे यांनी चेन्नईच्या Guindy Enginering College मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. 1987 मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसत होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-1 मिसाईलच बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.
ब्रम्होस निर्मितीच्या टीममध्ये सुरुवातीपासून कार्यरत
अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये कार्यरत आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.प
जळगावशी विशेष कनेक्शन
अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांच मूळगाव आहे. चेन्नईत शिक्षण घेतल्यानंतर अतुल राणे यांनी पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.