पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेने याबाबत अहवाल जाहीर केलाय. यात मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्याधीश असल्याचंही नमूद करण्यात आलंय. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात यावरुन चर्चेला उधाण आलंय.
असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेच्या अहवाला नव्या मोदी मंत्रिमंडळात 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यातही 24 मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर 4 मंत्र्यांवर अगदी खुनाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 5 मंत्र्यांवर समाजातील सौहार्द आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे गुन्हे दाखल आहेत. 7 जणांवर निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे.