सचिन तेंडुलकरचे उद्योग विश्वात पाऊल

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करलेल्या सचिन तेंडुलकरने उद्योग विश्वात पाऊल टाकले आहे. जुन्या कारच्या विक्री व्यवहारात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ‘स्पिनी’ (Spinny) कंपनीसोबत सचिनने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ‘स्पिनी’ कंपनीसोबत सचिनने सह-भागीदारी स्विकारली आहे. मात्र, गुंतवणुकीच्या आकडा अद्याप गुलदस्त्यातच आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू नंतर ‘स्पिनी’ सोबत भागीदारी करणारा सचिन दुसरा खेळाडू ठरला आहे.

‘स्पिनी’ने याविषयीचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. सचिन ‘स्पिनी’चा गुंतवणूक रणनीतीकार म्हणून कार्यरत असणार आहे. जागतिक स्तरावरुन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सचिनची भूमिका असणार आहे. ‘स्पिनी’चे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंह यांनी ‘स्पिनी’सोबतच्या सचिनच्या भागीदारीला दुजोरा दिला आहे. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतातील उद्योजक प्रयत्नशील असल्याचे सचिनने कारारानंतर म्हटले आहे.

स्पिनी’ने नुकतेच सीरिज-ई दरम्यान 28.3 कोटी डॉलरचे फंडिंग जमविले होते. ‘स्पिनी’ने युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त केला आहे. सीरिज-ईचे नेतृत्व अबुधाबी स्थित एडीक्यू, टायगर ग्लोबल यांनी केले होते. कंपनीच्या वर्तमान गुंतवणुकदारांत फिरोज दिवाण, एरिना होल्डिंग्स आणि थिंक इन्व्हेस्टमेंट्चा समावेश होतो.
15 शहर, 23 हब:

‘स्पिनी’चे सध्या 15 शहरात कार्यरत 23 कार हब आहेत. युनिकॉर्न क्लबमध्ये आतापर्यंत 40 भारतीय स्टार्ट-अपने स्थान प्राप्त केले आहे आणि 38 अरब डॉलरहून अधिक फंडिंग जमा केले आहे.

भारतात हजारो जुन्या कारच्या विक्रीचे व्यवहार केले जातात. ऑफलाईन किंवा पारंपरिक खरेदी मार्गाने अधिक वेळ लागतो. ‘स्पिनी’ने ग्राहकांना जुन्या कारचे एकाधिक पर्याय उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थाविना थेट जुन्या कारची जोखीम रहित खरेदी करणे शक्य ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.