एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत आता स्वप्नील लोणकरचं नाव

MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. 29 जून रोजी स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेला आता 6 महिने उलटल्यानंतर एमपीएससीच्या (MPSC) कारभाराचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत आता स्वप्नीलचं नाव आलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Service) 2019 च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचं नाव आलं आहे. या प्रकारामुळे स्वप्नीलचे कुटुंबीय आणि एमपीएससी विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्ती केला जातोय.

‘माझ्याकडे एमपीएससी आयोगाचं माझ्याकडे पत्र आहे. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची माहिती असतानाही एमपीएससी मुलाखतीसाठी तारीख जाहीर करत आहे. याचा अर्थ तो कच्चा नव्हता, तो हुशार होता. एक हजार एक टक्का एमपीएससीने माझ्या मुलाचा बळी घेतला आहे. इतकंच नाही तर एमपीएससी आमच्या लोणकर कुटुंबियांच्या जमखेवर मिठ चोळण्याचं काम करत आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा. असं स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.